एटीएम मधून पैसे चोरणारा मुख्य आरोपी गजाआड…

ठाणे – पुर्णा, भिवंडी येथील HDFC बँकेचे ATM मशिन कापून २६,०४,५००/- रू. रक्कम चोरून नेणाऱ्या मुख्य आरोपीस कैथवाडा, राजस्थान येथून गुन्हे शाखा घटक-२ भिवंडी पोलिसांनी अटक केली. शराफत अजमत खान असे याचे नाव आहे. तसेच त्याच्या इतर साथीदारांनाही पोलिसांनी अटक केली आहे. इलियास युनुस खान, गुलाम इलियास खान, शोएब इलियास खान, शराफत अजमत खान, तौफीक रफीक अंसारी अशी यांची नावे आहेत.
अनोळखी चोरट्यांनी पुर्णा भिवंडी येथील HDFC बँकेचे ATM मशिन कापून त्यामधील २६,०४,५००/- रू. ची रोकड चोरून नेलेली असल्याबाबत नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे या गुन्ह्यातील मुख्य आरोपी शराफत अजमत खान यास पोलिसांनी कैथवाडा, ता. पहाडी, जि. भरतपुर, राजस्थान येथून अटक केली. त्यानंतर त्याच्याकडे मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याच्या इतर साथीदारांनाही अटक करून त्यांच्याकडून गुन्हा करण्यासाठी वापरलेली दोन वाहने जप्त केली आहेत.