महाराष्ट्र
कॉलेजची संरक्षक भिंत कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू…
रत्नागिरी – चिपळूणमधील एका कॉलेजची संरक्षक भिंत कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चिपळूणच्या डीबीजे महाविद्यालयात ही घटना घडली असून, पावसामुळे या कॉलेजची संरक्षक भिंत कोसळली. आणि विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.
सुशांत घाणेकर असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. सुशांत बेपत्ता असल्याचे लक्षात आल्यानंतर शोधाशोध सुरू झाल्यावर मातीच्या ढिगाऱ्याखाली त्याचा मृतदेह सापडला. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला.