महाराष्ट्र
मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले…
महाराष्ट्र – मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक पुन्हा कोलमडले आहे. या मार्गाने धावणाऱ्या काही गाड्या या रद्द तर काही गाड्या या संथ गतीने पुढे जात आहेत. काही गाड्यांना पाच ते सात उशीर झाला आहे.
कोकणकन्या, तुतारी एक्स्प्रेससह आणखी काही एक्सप्रेस गाड्या या २ ते चार तास उशिराने धावत आहेत. तर काही गाड्या या मध्येच थांबवण्यात आल्या आहेत. मुंबईच्या दिशेने जाणारी निजामुद्दीन एर्नाकुलम एक्सप्रेस सहा ते सात तास उशिराने धावते. तर इतर गाड्या अर्धा ते एक तासाने उशिराने धावत आहे.