सात राज्यातील पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीला १०, भाजपला २ जागा…
new delhi – इंडिया आघाडीने सात राज्यांतील १३ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत १० जागांवर विजय मिळवला आहे. तर, भाजपने २ जागा मिळवल्या असून एका जागेवर अपक्ष आमदार निवडून आला आहे.
बिहार, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, मध्य प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हिमाचल प्रदेश या सात राज्यातील १३ जागांवर बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली. विविध पक्षांच्या विद्यमान आमदारांच्या मृत्यूमुळे किंवा राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागांमुळे पोटनिवडणूक घेण्यात आली.
बिहारमधील रुपौली, पश्चिम बंगालमधील रायगंज, राणाघाट दक्षिण, बागडा आणि माणिकतला; तामिळनाडू मधील विक्रवंडी; मध्य प्रदेशातील अमरवारा; उत्तराखंडमधील बद्रीनाथ आणि मंगळौर, पंजाबमधील जालंधर पश्चिम आणि हिमाचल प्रदेशातील देहरा, हमीरपूर आणि नालागढ या ठिकाणी मतदान झाले. त्यानंतर १३ जुलै रोजी मतमोजणी झाली.