वरळी अपघात प्रकरण; मिहीर शाहला अटक…
मुंबई – वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह याला मुंबई पोलिसांनी अखेर अटक केली आहे. मिहीर शाह याला पोलिसांनी ठाणे जिल्ह्यातल्या शहापूरमधून अटक केली असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी त्याच्यासह १२ जणांना अटक केली आहे.
वरळीत अपघात झाल्यानंतर मिहीर शाह फरार झाला होता. त्याला शोधण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली होती. अखेर पोलिसांनी मिहिर शाह याला अटक केली आहे. तसेच त्याच्यासह अटक करण्यात आलेल्या १२ जणांमध्ये मिहिर शाह याची आई आणि बहिणीचादेखील समावेश आहे. या १२ जणांनी मिहीर शाह याला पळून जाण्यासाठी मदत केली होती.
दरम्यान, पोलिसांनी मिहीर शाह याचे वडील राजेश शाह याला ताब्यात घेतलं होतं. पण कोर्टाकडून त्यांना जामीन मंजूर झाला आहे. यानंतर आता पोलिसांनी मिहीर शाह याला अटक केली आहे.