मुंबई
CNG आणि PNG च्या दरात वाढ…
मुंबई – मुंबईत सीएनजी आणि पीएनजीच्या दरामध्ये ९ जुलै पासून वाढ झाली आहे. सीएनजीच्या दरात दीड रुपयांनी तर पीएनजीच्या दरात एक रुपयाने वाढ झाली आहे. महानगर गॅस लिमिटेडने दरवाढ करण्याचा निर्णय घेतला असून, मध्यरात्रीपासून सीएनजी आणि पीएनजीचे नवे दर लागू झाले आहेत.
त्यामुळे मुंबईकरांना आता १ किलो सीएनजीसाठी ७५ रुपये मोजावे लागणार आहे. तर पीएनजीसाठी ४८ रुपये मोजावे लागणार आहेत.