ठाणे

ठाण्यात इमारतीचा पत्रा पडून दुर्घटना…

ठाणे – मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे ठाण्यात फुटबॉल मैदानावर एका इमारतीचा मोठा पत्रा कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या घटनेत मैदानावर खेळणारी ७ ते ८ मुले गंभीर जखमी झाली आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील गावंड बाग परिसरातील फुटबॉल मैदानात हि घटना घडली. फुटबॉल टर्फवर मुलं खेळत होती. त्यावेळी जोरदार पाऊस सुरू झाला, त्यासोबत सोसाट्याचा वारा सुरू झाला. जोरदार वाऱ्यामुळे बिल्डिंगवरचा पत्रा फुटबॉल टर्फवर कोसळल्यामुळे ७ ते ८ मुले गंभीर जखमी झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page