मोटार सायकल चोर गजाआड…

डोंबिवली – मोटार सायकल चोरणाऱ्या एका सराईत चोराला कल्याण गुन्हे शाखेने अटक केली आहे. गोपाळ रामदास अडसुळ असे याचे नाव असून, पोलिसांनी त्याच्याकडून ३ मोटारसायकल हस्तगत करून, टिळकनगर, डोंबिवली आणि महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यातील ३ गुन्हे उघडकीस आणले.
टिळकनगर पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना, काटई बदलापुर रोड, काटई नाका, डोंबिवली पूर्व येथे एक इसम चोरी केलेल्या दुचाकीसह येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुषंगाने पोलिसांनी सदर ठिकणी सापळा रचून गोपाळ अडसुळ याला अटक करून त्याच्याकडून एकूण ५०,०००/- रू किंमतीच्या ३ मोटारसायकली हस्तगत केल्या.
दरम्यान, पुढील कारवाईसाठी गोपाळ अडसुळ याला टिळकनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची यशस्वी कामगिरी पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शिवराज पाटील, पोलीस उप आयुक्त, गुन्हे व निलेश सोनावणे सहा. पोलीस आयुक्त, (शोध १) गुन्हे ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार, सपोनि संदिप चव्हाण, सहा. पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले, पोहवा विश्वास माने, पोहवा बालाजी शिंदे, पोहवा विलास कडु, पोना दिपक महाजन, पो.कॉ. गुरूनाथ जरग, पो. कॉ. मिथुन राठोड, पो.कॉ. विजेंद्र नवसारे पो.कॉ. विनोद चन्ने पो.कॉ. गोरक्ष शेकडे यांनी केली आहे.