मातोश्रीची भाकरी खातात आणि शरद पवारांची चाकरी करतात – दादा भुसे…

मुंबई – राज्याचे कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांच्या गिरणा ऍग्रो कंपनीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या संदर्भात संजय राऊत यांनी ट्वीट केले आहे. ट्वीटमध्ये त्यांनी म्हंटले आहे की, हे आहेत मंत्री दादा भुसे. शेतकरी त्यांच्या विरोधात रस्त्यावर आले आहेत. गिरणा अग्रो नावाने 178 कोटी 25 लाखांचे शेर्स शेतकऱ्याकडून गोळा केले. पण कंपनीच्या वेबसाईटवर केवळ 1 कोटी 67 लाखांचे शेअर्स केवळ 47 सभासदांच्या नावावर दाखवले. ही लूट आहे.लवकरच स्फोट होईल. या आरोपावर दादा भुसे यांनी विधानसभेत जोरदार प्रत्युत्तर दिले.
जगातली कोणतीही यंत्रणा लावून या आरोपांची चौकशी करा आरोप खरे ठरले तर मी आमदारकी, मंत्रीपद सोडेन, राजकारणातूनही निवृत्त होईन. पण आरोप खोटे निघाले तर राऊत यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा द्यावा. दैनिक सामनाच्या संपादक पदाचा राजीनामा द्यावा. हे लोक आम्हाला गद्दार म्हणतात. पण आमच्याच मतावर हे महागद्दार निवडून आले आहेत. हे भाकरी मातोश्रीची खातात आणि चाकरी राष्ट्रवादीची, पवारांची करतात, असेही दादा भुसे म्हणाले.
संजय राऊत यांनी मालेगावच्या नागरिकांची माफी मागावी. येत्या २६ तारखेपर्यंत मालेगावची माफी मागितली नाही तर शिवसैनिक गद्दारांना त्याची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा दादा भुसे यांनी दिला आहे.