मुंबई
पोलीस भरतीबाबत फडणवीसांची मोठी घोषणा…

मुंबई – राज्यात जिथे पाऊस आहे तिथे पोलीस भरती पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडवीस यांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, राज्यात ज्या ज्या ठिकाणी पाऊस आहे. तिथे पोलीस भरती पुढे ढकलण्यात आली आहे. पाऊस पुढे वाढणार आहे, त्यानंतर आचारसंहिता लागेल. त्यामुळे चाचणी पुढे गेली आहे.
जिथे पाऊस नाही त्याठिकाणी चाचण्या सुरु आहेत. तसेच मुलांचे वय निघून जाईल. त्यानंतर त्यांना दुसरी संधीही मिळत नाही. त्यात मुले घरी चालले आहेत. त्यांच्यासाठी फारशा व्यवस्था नाहीत. त्यामुळे त्यांच्यासाठी मंगल कार्यालयात व्यवस्था करायला सांगितली आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.