डोंबिवली

डोंबिवलीत सापडली गोणीभर मतदार ओळखपत्रे…

डोंबिवली – डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोणीभर मतदार ओळखपत्रे सापडली असल्याची धक्कदायक माहिती समोर आली आहे.

कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील टाटा पाॅवर नाका येथील पिसवली गावाच्या हद्दीत एका पोत्यामध्ये भरलेली हजारोहून अधिक मतदारांची ओळखपत्रे रस्त्यावर फेकलेली आढळून आली. बहुतांशी मतदार ओळखपत्रे कल्याण पूर्व भागातील नेतिवली, पिसवली, चक्कीनाका भागातील रहिवाशांंची असल्याचे समजते. मानपाडा पोलिसांनी ही ओळखपत्रे ताब्यात घेतली असून, याबाबत पोलीस तपास करत आहेत.

दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कल्याण डोंबिवलीमधील मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याच दिसून आलं होतं. अनेक मतदारांची नावं नव्हती. अनेक मतदारांना मतदार ओळखपत्र मिळाले नव्हते. या पार्श्वभूमीवर निवडणुकीनंतर इतक्या मोठ्या प्रमाणात मतदार ओळखपत्र आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button

You cannot copy content of this page