डोंबिवली

डोंबिवलीत टेम्पोच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या दोघांना अटक…

dombivali –  टेम्पोच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या दोघांना कल्याण गुन्हे शाखेने अटक केली आहे. सुहास उर्फ चिंग्या पाईकराव आणि रॉकी उर्फ मोनू चव्हाण अशी या दोघांची नावे असून, पोलिसांनी त्यांच्याकडून ३ बॅटऱ्या हस्तगत केल्या आहेत.

सुहास उर्फ चिंग्या पाईकराव आणि रॉकी उर्फ मोनू चव्हाण यांनी टेम्पोच्या मोठ्या बॅटऱ्या चोरून आणल्या असून त्या विकायला प्रीमियर कॉलनी मैदान जवळ मानपाडा शिल रोड, डोंबिवली पूर्व येथे येणार असल्याची माहिती कल्याण गुन्हे शाखेचे सहा.पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले यांना मिळाली होती. त्याआधारे कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सदर ठिकणी सापळा रचून सुहास उर्फ चिंग्या विजय पाईकराव आणि रॉकी उर्फ मोनू चव्हाण या दोघांना अटक करून त्यांच्याकडून ३ बॅटऱ्या (किंमत ८०००/- रु.) हस्तगत केल्या. सदरच्या बॅटऱ्या स्मशाल चौक, शेलार नका जवळ डोंबिवली पूर्व येथून चोरी केल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, या दोघांना मुद्देमालासह टिळक नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, गुन्ह्याचा पुढील तपास टिळक नगर पोलीस करत आहेत.

सदरची यशस्वी कामगिरी कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.संदीप चव्हाण, सपोनिरी.संतोष उगलमुगले, सहा.पो.उप.निरी.दत्ताराम भोसले, पो.हवा.बालाजी शिंदे, गुरुनाथ जरग, मिथुन राठोड, दिपक महाजन, चालक पो.हवा.बोरकर यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button

You cannot copy content of this page