महाराष्ट्र
पुणे अपघात प्रकरणात दोन डॉक्टरांना अटक…

पुणे – कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणात पुण्याच्या ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे.
या डॉक्टरांनी ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा आरोप आहे. डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर अशी या डॉक्टरांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या डॉक्टरांनी अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने घेतल्यानंतर ते कचऱ्यात फेकून दिले. आरोपी मुलाच्या वडिलांच्या सांगण्यावरून पुराव्यांशी छेडछाड तसेक रक्ताचे नमुने बदलल्याचे तपासात उघड झाले आहे.