महाराष्ट्र

राज्यात पहिल्या टप्प्यात ५४.८५ टक्के मतदान…

देशात आज लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. यात १९ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांमधील १०२ मतदारसंघांमध्ये संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदान झाले. त्यामध्ये पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मेघालय, उत्तर प्रदेश-बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि उत्तराखंड या राज्यांचा समावेश होता.

पहिल्या टप्प्यात सर्वाधिक मतदान पश्चिम बंगालमध्ये ७७.५७ टक्के आणि महाराष्ट्रात ५ लोकसभा मतदारसंघांमध्ये एकूण ५४.८५ टक्के मतदान झाले. यात गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान (६४.९५ टक्के मतदान) झाले आहे. तर सर्वात कमी मतदान हे नागपूरमध्ये (४७.९१ टक्के) इतके झाले आहे.  

देशात कोणत्या राज्यात किती टक्के मतदान झाले?

महाराष्ट्र – ५४.८५ टक्के

पश्चिम बंगाल – ७७.५७ टक्के

त्रिपुरा –  ७६.१० टक्के

पुडुचेरी – ७२.८४ टक्के 

आसाम – ७०.७७ टक्के

अरुणाचल प्रदेश – ६४.०७ टक्के

अंदमान आणि निकोबार – ५६.८७ टक्के

बिहार – ४६.३२ टक्के

उत्तर प्रदेश – ५७.५४ टक्के

उत्तराखंड – ५३.५६ टक्के   

छत्तीसगड –  ६३.४१ टक्के

जम्मू आणि काश्मीर- ६५.०८ टक्के

लक्षद्वीप – ५९.०२ टक्के

मध्य प्रदेश – ६३.२५ टक्के

मणिपूर – ६८.६२ टक्के

मेघालय – ६९.९१ टक्के

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button

You cannot copy content of this page