सार्वजनिक बौद्ध विहार आठरवाडी, हिंगोली येथील काही लोकांना बुध्दविहारात जाण्यास प्रतिबंध…

हिंगोली – सार्वजनिक बौद्ध विहार आठरवाडी, पो.पहेणी, हिंगोली या ठिकाणी बौद्ध विहारात मालमत्ता क्रमांक १५२ मध्ये नाथा, राजाराम, राहुल मोरे आणि त्यांच्या सर्व लोकांना बुध्दविहारात जाण्यास प्रतिबंध करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
परंतू नर्सी (नाम) पो. स्टेशनचे पो.निरी/अरुण नागरे व पो.हवा.डवले यांनी मा.उपविभागीय दंडाधिकारी यांना लेखी व तोंडी चुकीची माहिती देऊन कलम १४४ (३) नुसार खोटा आदेश पारित करून आम्हाला बुध्दविहारात जाण्यास प्रतिबंध करण्यात आल्याचा आरोप नाथा, राजाराम, राहुल मोरे आणि त्यांच्या सर्व लोकांनी केला आहे.

याबाबत जिल्हाधिकारी हिंगोली यांना नाथा, राजाराम, राहुल मोरे आणि त्यांच्या सर्व लोकांनी तक्रार अर्ज केला आहे. या अर्जात त्यांनी नर्सी पोलीस ठाण्याचे पो.निरी/अरुण नागरे यांनी दोन्ही गटाची मिटिंग घेऊन आम्हाला १४ एप्रिल २०२३ ला जयंती साजरी करण्यास तोंडी परवानगी दिली होती. आणि विरुद्ध गटास २५ एप्रिल २०२३ ला जयंती साजरी करण्यास परवानगी दिली होती.
दरम्यान, यावर्षी देखील जयंती साजरी करण्यासाठी आम्ही परवानगी मागण्यासाठी गेलो असता पो.निरी/अरुण नागरे यांनी परवानगी दिली नाही आणि आम्हाला हाकलून दिले, असे त्यांनी अर्जात म्हंटले आहे. आणि त्यानंतर पो.निरी/अरुण नागरे यांनी मा.उपविभागीय दंडाधिकारी यांना लेखी व तोंडी चुकीची माहिती देऊन कलम १४४ (३) नुसार खोटा आदेश पारित करून आम्हाला बुध्दविहारात जाण्यास प्रतिबंध केला. असेही अर्जात नमूद करण्यात आले आहे.
त्यामुळे या सर्व प्रकारामुळे नाथा, राजाराम, राहुल मोरे आणि त्यांची सर्व लोक आता न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.