मुंबई
४२ लाख रुपयांचे एमडी ड्रग्स जप्त; ३ ड्रग्ज तस्करांना अटक…

मुंबई – अंमली पदार्थ विरोधी कक्षाने एका महिलेसह सराईत ३ ड्रग्ज तस्करांना अटक करून ४२ लाख रुपयांचे, २१० ग्रॅम एम.डी. (मेफेड्रॉन) ड्रग्स जप्त केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे आझाद मैदान युनिटच्या पथकाने नागपाडा, मुंबई या परिसरात अंमली पदार्थ विरोधी कारवाई करत एका इसमास अटक केली. आणि त्याच्या ताब्यातून २४ लाख रूपये किंमतीचा १२० ग्रॅम एम.डी. (मेफेड्रॉन) जप्त केला.
तसेच अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे घाटकोपर युनिटच्या पथकाने मरोळ, अंधेरी, मुंबई या परिसरात अंमली पदार्थ विरोधी कारवाई करत एका महिलेसह एका इसमास अटक केली. आणि त्यांच्या ताब्यातून १८ लाख रूपये किंमतीचा ९० ग्रॅम वजनाचा एम.डी. (मेफेड्रॉन) जप्त केला.