मुंबई
नागपूर-मुंबई दुंरतो एक्सप्रेसमधून ४० लाखांची रोकड जप्त…
मुंबई – नागपूर-मुंबई दुरांतो एक्सप्रेस मधून ४० लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. जीआरपी आणि आरपीएफने ही संयुक्त कारवाई केली. आरपीएफला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर सीएसएमटी स्थानकात ही कारवाई करण्यात आली.
कपड्याच्या पार्सलच्या नावाखाली हि रोकड पाठवली होती. सीएसएमटी स्थानकात नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेस आली असता पोलिसांनी सामान कक्षातून हि रोकड जप्त केली.