सराईत चोरट्याकडून ६२ लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत…
भिवंडी – घरफोडी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखा घटक २, भिवंडी पोलिसांनी आसाम राज्यातून अटक करून त्याच्याकडून ६२ लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. मोईनुल अब्दुल मलीक इस्लाम असे याचे नाव आहे.
मोईनुल अब्दुल मलीक इस्लाम हा नवी मुंबईत राहत होता त्यावेळी त्याच्याविरूद्ध नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. पण सद्या तो फक्त चोरी करण्याकरीता विमानाने प्रवास करून मुंबईत येतो आणि चोरी केल्यानंतर पुन्हा विमानाने प्रवास करून आसाम व नागालँड राज्यात लपण्यासाठी पळून जातो आणि सद्या तो आसाम राज्यातील मुळ गावी आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्याआधारे पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे मोईनुल अब्दुल मलीक इस्लामला आसाम राज्यातून अटक केली. तसेच त्याच्याकडून एकूण ६२,२४,०००/- रू. किंमतीचे ८८९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करून ठाणे, कल्याण, डोंबिवली, मुंबई व नवी मुंबई पोलीस ठाण्यातील एकूण २२ गुन्हे उघडकीस आणले.