डोंबिवलीत महिलेकडून ५ लाखांचा अंमली पदार्थ जप्त…
डोंबिवली – एका वयोवृद्ध महिलेकडून टिळक नगर पोलिसांनी ५ लाखांचा अंमली पदार्थ जप्त करून तिला अटक केली आहे. सलमा बेगमनूर मोहम्मद शेख असे या महिलेचे नाव आहे.
कचोरेगाव, हनुमान नगर, मोहन सृष्टी लगत, पत्रीपूल कल्याण पश्चिम येथे सलमा बेगमनूर मोहम्मद शेख हि गर्द/ब्राऊन शुगर हा अंमली पदार्थ बेकायदेशीररित्या विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याअनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून सलमाला अटक केली. तिच्याकडे एकूण १०४ ग्रॅम वजनाचा तपकिरी रंगाचा गर्द/ब्राऊन शुगर (किंमत ५,२०,०००/- रूपये) हा अंमली पदार्थ आणि ३६,७९०/- रोख रक्कम मिळून आली. सदर प्रकरणी पोलिसांनी टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तिच्याकडून एकूण ५,५६,७९०/- रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त केला.
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त ठाणे शहर आशुतोष डुंबरे, पोलीस सह आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त परिमंडळ ३ कल्याण सचिन गुंजाळ, सहा. पोलीस आयुक्त कल्याण विभाग सुनिल कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विजयकुमार कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहा. पोलीस निरीक्षक बगाड, पोलीस उप निरीक्षक तेजल पवार, सपोउनि / शाम सोनवणे, मपोहवा/तिवरेकर, मपोहवा / मिसाळ, पोशि/ पवार, पोशि/ सपकाळे, पोशि/ कमोदकर यांनी केली.
दरम्यान, गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार कदम करीत आहेत.