तडीपार गुंड गणेश उर्फ गटल्या आहिरे धारदार कोयत्यासह कल्याण क्राईम ब्रांचच्या जाळयात…
डोंबिवली – तडीपार गुंड गणेश उर्फ गटल्या आहिरे याला धारदार कोयत्यासह कल्याण क्राईम ब्रांचने अटक केली आहे.
डोंबिवली पोलीस स्टेशनच्या रेकॉर्ड वरील नामचीन हद्दपार (तडीपार) केलेला गुंड गणेश उर्फ गटल्या बाळू आहिरे हा शेलार नाका परिसरात हातात धारदार भला मोठा कोयता घेऊन दहशत माजवत फिरत असल्याची माहिती कल्याण क्राईम ब्रांचचे युनिट-3 चे पो.हवा.दत्ताराम भोसले यांना त्यांच्या गुप्त बातमीदरामार्फत मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या आधारे कल्याण क्राईम युनिट – 3 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.निरी.संदीप चव्हाण, पो.हवा.दत्ताराम भोसले, विश्वास माने, गुरुनाथ जरग, बालाजी शिंदे, दिपक महाजन सदर पोलीस पथकाने सदर ठिकाणी जाऊन डोंबिवली पोलीस ठाण्याचे अभिलेखावरील हद्दपार (तडीपार) गणेश उर्फ गटल्या बाळू आहिरे याला पोलिसांना पाहून पळत असताना धारदार कोयत्यासह झडप घालून पकडले.
हद्दपार (तडीपार) गुंडास पोलीस उप आयुक्त सो. परिमंडल-3,कल्याण डोंबिवली यांच्याकडील हद्दपार आदेश दि. 22/11/2023 रोजी अन्वये पासून 18, महिन्याकरीता ठाणे जिल्ह्यातून हद्दपार केले असून त्याने मनाई आदेशाचा भंग करून मिळून आला असल्याची माहिती समोर आली.
तसेच गणेश हा डोंबिवली पोलीस स्टेशनचे रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्याच्यावर घातक शास्त्राने वार करून दहशत माजवणे असे एकूण 4 गुन्हे दाखल असून त्याच्यावर 2 वेळा प्रतिबंधक कारवाई पोलिसांनी केलेली आहे.
दरम्यान, गणेशविरुद्ध डोंबिवली पोलीस स्टेशन गुन्हा.रजि.नं.383/2024 भारतीय हत्यार कायदा कलम 4,25 सह,महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)135, व 142, प्रमाणे कारवाई करून डोंबिवली पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या तडीपार गुंडास कल्याण क्राईम ब्रांच युनिट-3 ने पकडून कारवाई केल्याने सदर भागातील जनतेकडून त्यांच्या कामगिरीच कौतुक होत आहे.