डोंबिवली

डोंबिवली पोलिसांनी गहाळ झालेला मोबाईल केला परत… 

डोंबिवली- डोंबिवली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गहाळ झालेला आयफोन (मोबाईल) डोंबिवली पोलिसांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या हस्ते तक्रारदार सुशील मोहिते यांना परत केला आहे.

डोंबिवली पोलीस ठाणे प्रॉपर्टी मि.नंबर १४६५/२०२३ मधील तक्रारदार सुशील मोहिते यांनी त्यांचा ६०,०००/- रुपये किंमतीचा आयफोन (मोबाईल) डोंबिवली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गहाळ झाला असल्याबाबत डिसेंबर २०२३ मध्ये डोंबिवली पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

त्यानुषंगाने पोलिसांनी सदर मोबाईलचा तांत्रिक पुरावाच्या आधारे शोध घेतला असता, सदर मोबाईल मिळून आला. त्यानंतर सदर मोबाईल वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या हस्ते सुशील मोहिते यांना परत देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page