महाराष्ट्र
शिवतारे बारामतीतून अपक्ष लढण्यावर ठाम; ‘या’ तारखेला फॉर्म भरणार…
शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे बारामती लोकसभा निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. १२ एप्रिलला ते आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. स्वतः त्यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत घोषणा केली. विजय शिवतारे अपक्ष निवडणूक लढवणार आहेत.
मला बारामतीत पवार पर्व संपवायचं आहे. राज्यात राजकीय चिखल झाला आहे. बारामतीत सुप्रिया सुळे यांनी २ टक्के कामही केलं नाही. दहशतवादाचा उगम शरद पवारांनी सुरु केला आहे. ४०-४० वर्ष पवारांनाच मतदान का द्यायचं? ही लढाई मला लढू द्या, माझी शिंदे-फडणवीसांना विनंती आहे, असं विजय शिवतारे पत्रकार परिषदेत म्हणाले.