डोंबिवलीतील पाळणाघरात ३ वर्षाच्या मुलीला लाकडी पट्टीने मारहाण…

डोंबिवली – डोंबिवलीतील एका पाळणाघरात ३ वर्षाच्या मुलीला लाकडी पट्टीने मारहाण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून, याप्रकरणी राम नगर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पूर्वेतील फडके रोड येथील हॅपी किड्स डे केअर या पाळणाघरात हा प्रकार घडला. या पाळणाघरात गणेश प्रभुणे, आरती प्रभुणे आणि राधा नाखरे हे तिघे लहान मुलांचा सांभाळ करतात. मंदार ओगले हे आपल्या ३ वर्षांची मुलगी याच पाळणाघरात ठेवतात.
गणेश प्रभुणे, आरती प्रभुणे आणि राधा नखरे या तिघांकडून ओगले यांच्या ३ वर्षाच्या मुलीला मानसिक त्रास देऊन, लाकडी पट्टीने मारहाण केल्याची माहिती समोर आल्याने ओगले यांनी याप्रकरणी राम नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल कुऱ्हाडे यांनी याची तात्काळ दखल घेत तक्रार दाखल करून घेण्यास सांगितले.
याप्रकरणी राम नगर पोलिसांनी गणेश प्रभुणे, आरती प्रभुणे आणि राधा नाखरे या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.