महाराष्ट्र
परभणीत बस पुलावरून कोसळली…

परभणी – जिल्ह्यात बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परभणीच्या जिंतूर तालुक्यातील अकोली येथे जिंतूरहुन सोलापूरला जात असलेली बस नदीच्या पुलावरून ५० फूट खाली कोसळली. या अपघातात बसमधील २० ते २५ प्रवासी जखमी झाले आहेत. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ही बस पुलाच्या खाली कोसळली.
दरम्यान, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.