डोंबिवली
डोंबिवलीत महानगर गॅसची पाइपलाइन फुटली.

डोंबिवली – डोंबिवली एमआयडीसी निवासी महानगर गॅसची पाइपलाइन फुटल्याची घटना घडली असून, सुदैवाने मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी निवासी मधील गणेश मंदिर जवळ भूमिगत महानगर गॅस पाइपलाइन एमआयडीसी कडून नवीन सांडपाणी वाहिन्यांचे खोदकाम करीत असता फुटली. त्यामुळे सदर परिसरात गॅस पसरून वास येऊ लागला होता.
दरम्यान, तेथील रहिवाशांनी ताबडतोब महानगर गॅस कंपनीला त्वरित कळविले असता, महानगर गॅस कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी येऊन फुटलेल्या पाइपलाइन मधील गॅस पुरवठा बंद केल्याने मोठा अनर्थ टळला.