नवी मुंबई

गोळीबार करून खुनाचा प्रयत्न करणारे ऐरोलीतून अटक…

नवी मुंबई – गोळीबार करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या नागपूर ग्रामीणमधील तिघांना रबाळे पोलिसांनी ऐरोली येथून अटक केली. सूरज कावळे, साहिल बागडे आणि पियुष वहाने अशी या तिघांची नावे आहेत.

खापरखेडा पोलीस स्टेशन, नागपूर ग्रामीण गुन्हा रजि. नं  132/2024 भा द वि कलम 307,34 सह आर्म ऍक्ट 3,25,27  तसेच गुन्हा रजि. नं.144/2024 आर्म ऍक्ट 3,25,27 मधील आरोपींचा शोध घेण्यासाठी नागपूर पोलिसांचे एक पथक रबाळे पोलीस स्टेशन येथे आले होते.

सदर आरोपी हे ऐरोली परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुषंगाने रबाळे आणि नागपूर पोलिसांनी मिळून सदर तिघांना दिवा गाव सर्कल येथून अटक केली.

सदरची यशस्वी कामगिरी रबाळे पोलीस स्टेशनचे वपोनिरी संजीव धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली रबाळे पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे PSI दयानंद वणवे, वायंगणकर, करंकाळ आणि नागपूर पोलिसांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button

You cannot copy content of this page