महाराष्ट्र न्यूज तर्फे कर्तृत्ववान महिलांचा ‘कर्तव्य जननी’ पुरस्काराने सन्मान…

डोंबिवली – महाराष्ट्र न्यूज आयोजित ‘कर्तव्य जननी’ सन्मान सोहळा २०२४’ डोंबिवली येथे उत्साहात पार पडला.
जागतिक महिला दिन आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून महाराष्ट्र न्यूजच्या वतीने विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या तसेच उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांसाठी ‘कर्तव्य जननी’ सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमात सुप्रसिद्ध कवी अशोक नायगावकर (प्रमुख पाहुणे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष), सुधाकर सुराडकर (माजी पोलीस महासंचालक), डॉ. सुषमा बसवंत (सामाजिक कार्यकर्त्या आणि कार्यक्रमाच्या प्रमुख प्रवक्त्या), भूषण कडू (सुप्रसिद्ध अभिनेता) डॉ. सुनील खर्डीकर (महाराष्ट्र न्यूज सल्लागार) असे दिग्ग्ज मान्यवर उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र न्यूज संपादिका अमृता पाटणकर यादेखील व्यासपीठावर उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची सुरवात दीप प्रज्वलाने आणि क्रांतीज्यीतो सावित्रीबाई फुले यांना पुष्पहार घालून झाली. त्यानंतर महाराष्ट्र न्यूजच्या संपादिका अमृता पाटणकर आणि सल्लागार डॉ. सुनील खर्डीकर यांनी उपस्थित मान्यवरांचे शाल, पुषपगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले. आणि
या सर्व मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या तसेच उल्लेखनीय काम करणाऱ्या ऍड. नितिना राजपुरे (वकील), प्रतिभा भिडे (लेखिका), अदिती नांदोसकर (लेखिका), रेखा निरभवने (कला), चैताली शिंदे (सामाजिक कार्यकर्त्या), डिंपल जोशी (शिक्षिका), कविता म्हात्रे (सामाजिक कार्यकर्त्या), मितू मिरजकर (गट निर्देशक), पौर्णिमा पाटील (वकील), श्लोक पाटील (शिक्षिका) यांच्यासहित एकूण ५४ महिलांना ‘सन्मानपत्र’ देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमात सुप्रसिद्ध कवी अशोक नायगावकर यांनी आपल्या भाषणात हसवता हसवता स्त्रियांचे आजचे जीवन कसे आहे याचे वास्तव मांडले. तसेच माजी पोलीस महासंचालक सुधाकर सुराडकर यांनी महिलांना सुरक्षेविषयी मार्गदर्शन केले आणि कार्यक्रमाच्या प्रमुख प्रवक्त्या डॉ. सुषमा बसवंत यांनी आपल्या भाषणात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट कसा होता हे सांगितले. तसेच सावित्रीबाई फुले यांना अजूनही भारतरत्न मिळाला नाही याची खंत व्यक्त केली.
कार्यक्रमात अनेक नागरीक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन सुरेश व्हावळ, राम सावंत, अनिल यादव, त्रिशूल उमाळे, प्रविण बेटकर या सर्व महाराष्ट्र न्यूजच्या टीमने केले होते. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण गायकवाड (शिवा) यांनी केले.