डोंबिवली

बनावट अमूल बटर बनवणाऱ्या कारखान्यावर कल्याण गुन्हे शाखेची धडक कारवाई; २ लाखांचा मुद्देमाल केला जप्त…

डोंबिवली – बनावट अमूल बटर बनवणाऱ्या एका कारखान्यावर कल्याण गुन्हे शाखेने धडक कारवाई करत २ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच दोघांना अटक केली.

काटई बदलापूर रोडला खोणी गावाजवळ मानवी सेवनास हानीकारक असलेला अवैध बटर बनविण्याच्या कारखाना चालू असल्याची माहिती कल्याण गुन्हे शाखेचे पोहवा दत्ताराम भोसले आणि पोकों गुरूनाथ जरग यांना मिळाली होती. त्यानुषंगाने पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या मदतीने नवीन निर्माणधीन इमारत, तरंग हॉटेलजवळ, खोणी गाव, काटई बदलापुर पाईपलाईन रोड, डोंबिवली पूर्व येथे छापा टाकून पिंटु झीनक यादव आणि प्रेमचंद फेकुराम या दोघांना अटक केली. हे दोघे याठिकाणी अवैध बटर बनवित असताना मिळून आले. याठिकाणाहून पोलिसांनी अवैध बटर बनविण्याकरीता लागणारे साहित्य, मशिन व इतर कच्चा माल, अमूल कंपनीचे कागदी बॉक्स असा सुमारे २,९३,२५५/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

दरम्यान, कारखान्याचा मालक पिंटु झीनक यादव हा सदरचे बटर है वनस्पती (कमानी करूणा), रिफायनड पामोलीन ऑईल (कमानी फायवेल), मीठ, अनॅटो फुड कलर यांचे मिश्रण टाकीमध्ये एकत्रित करून ते मशिनच्या सहायाने हलवून एकजीव करून मोल्डच्या ट्रे मध्ये आकार येण्यासाठी ठेऊन नंतर त्यातून काढून ते घट्ट करण्यासाठी डीप फ्रिजमध्ये ठेवत होता. त्यांनतर या बटरला अमूल कपंनीच्या नावाचे बटर पेपर लाऊन नंतर ते अमूल कपंनीच्या बटर विक्री साठी वापरण्यात येणाऱ्या कागदी बॉक्स मध्ये ते पॅक करून किरकोळ हॉटेल्स तसेच सॅन्डविच हातगाडी व ढाबे या व्यावसायिकांना ओरीजनल अमूल बटर म्हणुन पुरवित होता. अशी माहिती समोर आली आहे.

सदरची यशस्वी कामगिरी पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, शिवराज पाटील, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, व निलेश सोनावणे, सहाय्यक पोलीस आयुक्त (शोध १) गुन्हे शाखा, ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार, पोनि राहुल मस्के, सपोनि संदीप चव्हाण, पोउपनि संजय माळी, पो.हवा दत्ताराम भोसले, पोहवा बालाजी शिंदे, पोहवा विश्वास माने, पोहवा विलास कडु, पोहवा अनुप कामत, पो.ना सचिन वानखेडे, पोशि गुरूनाथ जरग, पोना दिपक महाजन, पोशि विजेन्द्र नवसारे, मपोहवा मेघा मपोशि मंगला गावित चालक पोहवा अमोल बोरकर यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page