kalyan

कल्याणमध्ये बनावट देशी दारूच्या ४८ हजार बाटल्या जप्त…

कल्याण – कल्याणमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने बनावट देशी दारूच्या ४८ हजार बाटल्या जप्त करून दोघांना अटक केली आहे. साईनाथ रामगिरवार, अमरदीप फुलझेले अशी या दोघांची नावे आहेत.

बनावट देशी दारूचा ट्रक कल्याणमध्ये येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभाग कल्याण पथकाला मिळाली होती. त्यानुषंगाने सदर पथकाने कल्याण मुरबाड रोड परिसरात सापळा रचला आणि ट्रक सुभाष चौक परिसरात येताच पथकाने ट्रक थांबवून पाहणी केली असता ट्रकध्ये बनावट देशी दारुच्या ४८ हजार ४०० बाटल्या मिळून आल्या. या दारूचा बाटल्यावर नगर जिल्ह्यातील एका नामांकित कंपनीचे लेबल लावण्यात आले होते.

दरम्यान, या पथकाने हा दारूचा साठा जप्त करून दोघांना अटक केली तसेच ट्रकहि जप्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page