देश

काँग्रेसची पहिली यादी जाहीर …

नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. राहुल गांधी यांना पुन्हा वायनाड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महासचिव के.सी.वेणुगोपाल यांनी ही यादी जाहीर केली.

या यादीत ३९ नावे असून, दिल्ली, छत्तीसगड, तेलंगणा, मणिपूर, मेघालय, त्रिपुरा, कर्नाटक, केरळ, सिक्किम आणि लक्षद्वीप इत्यादी राज्यांच्या उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे.

तसेच यादीत १५ उमेदवार सर्वसाधारण गटातील आहेत, तर २४ उमेदवार मागासवर्गीय, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजातील आहेत. दरम्यान, या यादीत महाराष्ट्राचा समावेश नाही.

महत्त्वाची नावे…

राहुल गांधी- वायनाड

शिवकुमार दहिया- जांजगीर चांपा

भूपेश बघेल- राजनांदगांव

शशी थरूर- तिरुवनंतपूरम

डीके सुरेश- बेंगळुरू ग्रामीण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button

You cannot copy content of this page