महाराष्ट्र
किल्ले रायगडावर शरद पवार गटाच्या तुतारी चिन्हाचे अनावरण…

रायगड – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ‘तुतारी’ चिन्हाचा अनावरण सोहळा रायगडावर पार पडला.
शरद पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस असे निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे. या चिन्हाचे शरद पवार यांनी शनिवारी (२४ फेब्रुवारी) रायगडावर जाऊन अनावरण केले. त्यावेळी राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित होते.
दरम्यान, या सोहळ्यात सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अमोल कोल्हे आणि जितेंद्र आव्हाड यांनी तुतारी वाजवून आगामी निवडणुकींचे रणशिंग फुंकले.