डोंबिवलीत सिलेंडरमधून गॅस चोरी करणाऱ्या तिघांना अटक…

डोंबिवली – घरगुती सिलेंडरमधून बेकायदेशीररीत्या गॅस चोरी करणाऱ्या तिघांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. सुजय कदम ,पप्पू मिश्रा, उत्तम बनकर अशी या तिघांची नावे आहेत.
काही इसम विको नाका परिसरात घरगुती सिलेंडरमधून बेकायदेशीररीत्या गॅस काढत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून या तिघांना अटक केली. हे तिघेजण त्याठिकाणी तरुण भारत गॅस कंपनीच्या घरगूती गॅस सिलेंडरमधून गॅस काढून दुसऱ्या कमर्शियल बाटल्यात भरत होते. आणि तो कमर्शियल सिलेंडर विक्री करत होते. सदर प्रकरणी पोलिसांनी त्यांच्याकडून ३५ घरगुती सिलेंडर, ९ कमर्शियल सिलेंडर अशी एकूण ४४ सिलेंडर, इलेक्ट्रिक वजन काटा, गॅस भरण्यासाठी वापरलेला कॉम्प्रेसर पिस्टन असे साहित्य जप्त केले.
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस उपायुक्त परिमंडळ ३ कल्याण, सचिन गुंजाळ, सहा.पोलीस आयुक्त कल्याण विभाग सुनिल कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने पोलीस अधिकारी प्रशांत आंधळे आणि त्यांच्या पोलीस पथकाने केली.