कार्यकारी अभियंत्यासह दोघे एसीबीच्या जाळ्यात…
thane – 20 हजारांची लाच घेताना ठाणे जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील कार्यकारी अभियंता आणि शिपाई या दोघांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. विकास जाधव असे कार्यकारी अभियंत्याचे नाव आहे तर चेतन देसले असे शिपायाचे नाव आहे. 45 हजारांच्या लाचेची मागणी करुन 20 हजारांची लाच घेताना एसीबीने त्यांना पकडले.
तक्रारदार यांच्या प्रलंबित बिलातील रक्कमेच्या २.५ टक्के प्रमाणे 45,000/- रूपये लाचेची मागणी करीत असल्याबाबत यातील तक्रारदार यांनी त्यांचेविरूध्द कारवाई करण्याकरिता अँटी करप्शन ब्युरो, ठाणे येथे दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान विकास जाधव यांनी बिलातील शासकीय शुल्क कपात करून
उर्वरीत बिलाच्या रक्कमेच्या 2.5 टक्के प्रमाणे 27,000/- रूपये लाचेची मागणी करून तडजोडअंती 20,000/- रूपये स्विकारण्याचे मान्य करून सापळा कारवाई दरम्यान चेतन देसले यांना तक्रारदार यांच्याकडून 20,000/- रूपये लाचेची रक्कम घेताना एसीबीने रंगेहात पकडले. तसेच याप्रकरणी कार्यकारी अभियंता विकास जाधव यांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे.