मुंबई
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींचे निधन…

मुंबई – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने आज पहाटे ( २३ फेब्रुवारी ) तीनच्या सुमारास निधन झाले, ते ८६ वर्षाचे होते. त्यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून मनोहर जोशी यांची ओळख होती.