महाराष्ट्र
सांगलीतील कुपवाडमधून १४० किलो ‘एमडी’ जप्त…

सांगली – सांगलीतील कुपवाडमध्ये १४० किलो एमडीचा साठा जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे गुन्हे शाखेच्या पथकाने सांगली पोलिसांच्या मदतीने कुपवाडमधील स्वामी मळा परिसरात छापा टाकून मिठाच्या पोत्यात लपवून ठेवलेले १४० किलो एमडी (किंमत अंदाजे ३०० कोटी) जप्त केले.
तसेच या प्रकरणी आयुब मकानदार याच्यासह दोन जणांना अटक केली.