राहुल नार्वेकरांनी अन्यायाचं नाव न्याय ठेवलं – अॅड. असिम सरोदे…

मुंबई – आमदार पात्र-अपात्र प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी निकाल दिल्यानंतर या निकालावर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापत्रकार परिषद घेतली या परिषदेत अॅड. असिम सरोदे यांनी राहुल नार्वेकरांवर जोरदार टीका केली.
राहुल नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन न करता त्यांचा विश्वासघात केला, नार्वेकरांनी अन्यायाचं नाव हे न्याय ठेवलं आणि निकाल दिला असे सरोदे म्हणाले.
बरेच लोक सांगतात वकिलांनी कोर्टात बोलावे इतर ठिकाणी नाही. येथे आज केवळ सत्याची बाजू आहे. आज कायदेशीर बाबी यांचे विश्लेषण करण्यासाठी येथे जमलो आहोत. न्यायालय एक व्यवस्था आणि यंत्रणा म्हणून दबावाखाली घेण्यात आली आहे. पक्षांतर कसे करायचे असा निकाल त्यांनी दिला आहे. ही कायद्याविरोधी जी प्रवृत्ती तयार होत आहे याबद्दल बोलले पाहिजे.
10 परिशिष्ट बद्दल लोक बोलतात की, हे कोर्टात बोलावे. भारत हा एक राज्य व्यवस्था आहे. आपण नागरिक आणि मतदार आहोत. पात्र कोण आणि अपात्र कोण याबद्दल 10 परिशिष्ट मध्ये आहे. आमदार यांनी निवडणून आल्यावर हा विधिमंडळ पक्ष असतो. हा पाच वर्षाचा असतो. मूळ राजकीय पक्ष हा शिवसेना आहे, बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केला आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत गेलेले लोक विधिमंडळ पक्ष होता. एखाद्या पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीला गेले नाही तर अपात्र होऊ शकतात. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत पळून गेलेले आमदार कोणत्याही पक्षात विलीन झाले नाहीत म्हणून ते अपात्र ठरतात. दोन तृतीयांश संख्येनं गेले नाही. आधी 16 गेले त्यामुळे ते अपात्र ठरू शकतात, असेही त्यांनी म्हंटले आहे.जेव्हा एखाद्याची विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड होते तेव्हा निरपेक्ष वागले पाहिजे. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे होते. विधानसभेसंदर्भात जेव्हा अपात्र कोण होत असेल तर त्याची सुनावणी ही विधानसभा अध्यक्षांच्या समोर झाली पाहिजे. त्यांनी सुप्रीम कोर्टाचा विश्वासघात केला आहे. पक्षांतर बंदी कायद्याचा उद्देश हा आहे की पक्षांतर थांबले पाहिजे.
अपात्र प्रकरण हे थेट अध्यक्ष यांच्याकडे गेले नव्हते हे आधी सुप्रीम कोर्टामध्ये गेले. आणि सुप्रीम कोर्टाने सांगितले की, एकनाथ शिंदे यांची नेता म्हणून निवड केली ती बेकायदेशीर आहे. अध्यक्ष यांनी मूळ राजकीय पक्ष हाच व्हीप असला पाहिजे. 3 जुलै 2022 रोजी भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून त्याची निवड केली होती ती बेकायदेशीर होती, असे असीम सरोदे यांनी सांगितले आहे.
अध्यक्ष यांनी वाजवी कालावधीमध्ये निर्णय द्यावा, असे सुप्रीम कोर्ट यांनी सांगितले होते. परंतु, यामध्ये राजकारण केले. राहुल नार्वेकर यांच्या मदतीने राजकारण करणारे लोकशाही विरोधी आहेत. या निर्णयामध्ये एक फालतू माणूस पण तो महत्त्वाचा आहे. त्यांना सुप्रीम कोर्ट यांनी फटकारले होते.
राहुल नार्वेकर यांनी विधिमंडळ पक्षातील बहुमत म्हणून निर्णय दिला. सुप्रीम कोर्ट यांनी सांगितले होते केवळ बहुमत महत्त्वाचे नाही. त्यासोबत लीगल आयडेंटीटी काय आहे हेही महत्वाचे होते. राहुल नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन न करता त्याचा विश्वासघात केला, नार्वेकरांनी अन्यायाचं नाव हे न्याय ठेवलं आणि निकाल दिला, अशी टीका असिम सरोदे यांनी केली.