मुंबई
मुंबईत १ लाखांचा नायलॉन मांजा जप्त…

मुंबई – मुंबई शहरात मकर संक्रातीच्या अनुषंगाने नायलॉन मांजाच्या वापरावर प्रतिबंध करण्याकरीता मुंबई पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
त्याअंतर्गत नायलॉन मांजा वापरल्याप्रकरणी एकूण ९२ गुन्हे दाखल करण्यात आले असून, एकूण ५७ इसमांवर अटकेची तसेच इतर कायदेशीर कारवाई करण्यात आल्या आहेत. तसचे एकूण रूपये १,४३,२४०/- किंमतीचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला आहे.
हि कारवाई २५ डिसेंबर २०२३ ते १४ जानेवारी २०२४ या दरम्यान करण्यात आली असून, यापुढेही देखील हि मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे