न्हावा शेवा बंदरातून 10.08 कोटींचा परदेशी सिगारेटचा कंटेनर पकडला…

मुंबई – न्हावा शेवा बंदरातून 10.08 कोटी रुपयांच्या परदेशी सिगारेटचा कंटेनर पकडण्यात आला आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई विभागीय युनिटने हि कारवाई केली आहे.

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई विभागीय पथकाने कारवाई करून संयुक्त अरब अमिराती बंदरातून आयात करण्यात आलेल्या मालाचे दोन कंटेनर पकडले. यात पहिल्या कंटेनरमध्ये चिनी कापडाचे विणलेले गालिचे होते जे परदेशी-ब्रँडच्या विशेषतः एस्से चेंज सिगारेटचा (कोरियामध्ये निर्मिती झालेले) संपूर्ण माल झाकण्यासाठी होते, तर दुसरा कंटेनरमध्ये जुन्या आणि वापरलेल्या गालीच्यांचे 325 रोल (गुंडाळे) होते. ज्यात सिगारेटच्या एकूण 67,20,000 कांड्या लपवून ठेवण्यात आल्या होत्या.
सदर पथकाने सर्व मुद्देमाल जप्त केला असून, जप्त करण्यात आलेल्या सिगारेटची अंदाजे किंमत 10.08 कोटी रुपये इतकी आहे.