मुंबई
२६ लाखांची फसवणूक करणारा अटकेत…

मुंबई – ७ वर्षांपूर्वी कंपनीचे ८७.७५ कॅरेटचे हिरे (किंमत एकूण २६ लाख ९१ हजार २०० रुपयांची) फसवणूक करून परागंदा झालेल्या आरोपीस अटक करण्यात गुन्हे शाखा, कक्ष ८ पोलिसांना यश आले आहे. भोलाप्रसाद वर्मा असे याचे नाव आहे.
२०१७ साली भोलाप्रसाद वर्मा याने फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून, त्यांच्या कंपनीचे ८७.७५ कॅरेटचे हिरे, (किंमत एकूण २६ लाख ९१ हजार २०० रुपये) मालमत्तेची फसवणूक केली होती आणि तो गुन्हा घडल्यापासून मुंबईतून परागंदा झाला होता.
सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा कक्ष ८ पोलीस करत होते. त्यांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे भोलाप्रसाद वर्माला गोरखपुर, उत्तर प्रदेश येथून अटक केली.