राजकीय आजार माझ्या स्वभावात नाही – अजित पवार…
पुणे – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काही दिवसांपूर्वी डेंग्यूची लागण झाली होती. त्यानंतर अजित पवार यांना राजकीय आजार तर झाला नाही ना अशी चर्चां राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. या चर्चेला अजित पवारांनी आता उत्तर दिले आहे.
अजित पवार म्हणाले की, ‘दिवाळीच्या आधी मला डेंग्यू आजार झाला होता. त्या आजारामध्ये माझे १५ दिवस गेले. दुर्दैवाने त्यावेळेस मी टिव्ही पहायचो, पेपर वाचायचो, त्यावेळी राजकीय आजार अशा बातम्या पाहिल्या. मी काही असला लेचापेचा माणूस नाही, जी माझी मतं असतात ती, मी गेली ३२ वर्षींपासून स्पष्टपणे लोकांसमोर मांडत असतो. राजकीय आजार अशा गोष्टी माझ्या रक्तात आणि स्वभावात नाही.
कारण नसताना अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या आल्या. काही दिवसांपुर्वी मी अमित शहा यांनी भेटण्यासाठी गेलो होतो. तेव्हा पण मी तक्रार करायला गेलो, अशा बातम्या आल्या. तक्रार करणं माझ्या रक्तातच नाही, शेवटी काम करत असताना सर्वांना सोबत काम करायचं असतं, तसी आपली परंपरा आहे, ती आपण चालवली पाहिजे, असेही अजित पवार म्हणाले.