मुंबई
आमदार अपात्रता प्रकरण, पुढील सुनावणी…

मुंबई – सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणी दुसरी सुनावणी विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर पार पडली. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी १३ ऑक्टोबरला होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
आज झालेल्या सुनावणीत दोन्ही गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. शिवसेना ठाकरे गटाकडून वकील देवदत्त कामत यांनी बाजू मांडली. तर शिंदे गटाकडून अनिलसिंह साखरे यांनी बाजू मांडली.
सर्व दाखल ३४ याचिका एकत्रित करून सुनावणी करा, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली. तर शिंदे गटाच्या वकिलांकडून या मागणीला विरोध करण्यात आला. दरम्यान, या प्रकरणात पुढील सुनावणी १३ ऑक्टोबरला होणार आहे.