डोंबिवलीत गतिमंद मुलीची हत्या…

डोंबिवली – एका अल्पवयीन गतिमंद मुलीची गळा आवळून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या मुलीच्या वडिलांनीच तिची हत्या केली आहे. सदर प्रकरणी मानपाडा पोलिसांनी या मुलीच्या वडिलांना अटक केली आहे. मनोज कुमार रामप्रसाद आग्रहारी असे याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार डोंबिवली पूर्वेतील माणगाव स्मशानभूमीच्या मागे हि घटना घडली. मनोज हा माणगाव चाळीच्या मागील एकाच चाळीत पत्नी लीलावती आणि अल्पवयीन मुलगी लवली यांच्यासोबत राहतो. मनोज हा किराणा दुकानात काम करत होता. त्याची मुलगी लवली ही जन्मापासून गतिमंद आहे. तिला बोलता आणि ऐकता येत नव्हते. त्यामुळे मुलीच्या या आजारपणाला कंटाळून दारुड्या मनोज कुमार याने मुलीची हत्या केली असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, मानपाडा पोलिसांनी मनोज कुमार ला अटक केली आहे.