दागिने घेऊन फरार झालेला अटकेत…

डोंबिवली – १२ लाखांचे दागिने घेऊन फरार झालेल्या नोकरास डोंबिवली पोलिसांनी अवघ्या ३ तासात अटक केली. विक्रम रावल असे या नोकराचे नाव आहे.
डोंबिवली पूर्वेतील प्रगती ज्वेलर्समध्ये काम करणारा नोकर विक्रमला एकूण १२,७२,०००/- रु. किंमतीचे दागिने होलमार्क करण्यासाठी दिले असता ते दागिने घेऊन तो फरार झाला असल्याबाबत डोंबिवली पोलीस ठाण्यात गु.र.क्र. ३१९/२०२३ कलम ४०८ भा.दं.वि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे ठाकुर्ली रेल्वे स्टेशन येथून विक्रमला अटक करुन त्याच्याकडून १२,७२,०००/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले.
सदरची यशस्वी कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग दत्तात्रय शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ -३, कल्याण सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग सुनिल कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि योगेश सानप, पो.उप.नि अजिंक्य धोंडे, पोहवा विशाल वाघ, पोहवा सरनाईक, पोहवा करणे पो.अ पाटील, पो.अं नितीन सांगळे, पोअं. पोटे, पोहवा निसार पिंजारी, कोळसेवाडी पो.ठाणे यांनी केली.