डोंबिवलीत वाहतूक पोलिसांचे प्रशिक्षण शिबिर संपन्न!…

डोंबिवली – डोंबिवली पूर्वेतील शुभम हॉल येथे वाहतूक पोलिसांचे प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले असल्याची माहिती डोंबिवली वाहतूक उपविभागाचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी दिली आहे.
कल्याण वाहतूक विभागातील कल्याण, कोळसेवाडी, डोंबिवली वाहतूक उपविभागातील वाहतूक पोलीस अधिकारी, अंमलदार व ट्रॅफिक वार्डन यांच्याकरीता वाहतुकीची चिन्हे, वाहतूक नियमन व व्यवस्थापन या महत्वपूर्ण विषयावर प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते.

सदर प्रशिक्षणाकरिता व्याख्याते म्हणून सेवानिवृत्त सहापोउपनिरी श्रीधर सारंग यांनी उपस्थित राहून PPT द्वारे मार्गदर्शन केले तसेच स्व.इंदिरा गांधी चौक येथे प्रत्यक्ष अंमलदार यांच्याकडून कमी वेळेत जास्तीत जास्त वाहनांचे वाहतूक नियमन कसे करावे याबाबत प्रात्यक्षिक करून घेतले व त्याचा सराव केला आहे.
दरम्यान, त्यावेळी सपोआ कल्याण वाहतूक विभाग व ५ अधिकारी, ४० अंमलदार, ३० वॉर्डन हजर होते.