ज्वेलर्समध्ये चोरी करणाऱ्या महिलांना अटक…

डोंबिवली – पूर्वेतील विनायक ज्वेलर्स या दुकानात चोरी करणाऱ्या दोन महिलांना डोंबिवली पोलिसांनी अटक केली. उषाबाई दगडु मकाळे उर्फ मनकाळे आणि लिलाबाई उर्फ शांताबाई सुर्यभान ढोकळ अशी या दोघींची नावे आहेत.
याबाबत वृत्त असे आहे कि, विनायक ज्वेलर्स या दुकानाच्या मालकाचा मुलगा दुकानात असताना दोन महिलांनी दुकानात येऊन दुकानातील चांदीच्या धातूच्या २० ते २५ जोडया अंदाजे ११०० ग्रॅम वजनाच्या चोरून नेल्या असल्याबाबत डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. २५३/२०२३ भा.दं.वि. कलम ३८०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्याअनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे उषाबाई दगडु मकाळे उर्फ मनकाळे आणि लिलाबाई उर्फ शांताबाई सुर्यभान ढोकळ या दोन महिलांना अटक करून त्यांच्याकडून ४,०००/- रू किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३. कल्याण सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग सुनिल कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक बळवंत भराडे, पोहवा सुनिल भणगे पोलीस हवा सचिन भालेराव पोहवा तुळशिराम लोखंडे, पो. हवा निसार पिंजारी, पोना हनमंत कोळेकर, पोशि शिवाजी राठोड, म.पो. हवा सावंत, मपोना महाडेश्वर मपोशि शेख यांनी केली.