डोंबिवली
डोंबिवलीत कारगिल विजय दिनानिमित्त रॅलीचे आयोजन…
डोंबिवली – कारगिल विजय दिनानिमित्त रॅलीचे आयोजन कऱण्यात आले होते. डोंबिवली वाहतूक उपविभाग आणि रोटरी क्लब Midtown, safety welfare association, विविध शाळा, RSP शिक्षक यांच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
या रॅलीत विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत विविध पोस्टर्स, बॅनर्स व्दारे जनागृती केली. यामध्ये 12 शाळा, 205 विद्यार्थी, 40 शिक्षक सहभागी झाले होते. त्यानंतर कॅप्टन विनयकुमार सच्चान स्मारक, घारडा सर्कल डोंबिवली पूर्व या ठिकाणी शहिदांना आदरांजली अर्पण करीत या रॅलीची सांगता झाली.