ठाणे
जबरीने मोबाईल चोरणारा अटकेत…

कल्याण – जबरीने मोबाईल चोरणाऱ्या एकास महात्मा फुले चौक पोलिसांनी अटक केली. शाहिद शेख उर्फ छोटा बेरिंग असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
याबाबत वृत्त असे आहे कि, कल्याण पश्चिमेत विजय अग्रवाल हे घरी पायी चालत जात असताना त्यांच्या पाठीमागून आलेल्या एका अनोळखी इसमाने त्यांना त्यांचा मोबाईल मागीतला. परंतू विजय यांनी मोबाईल देण्यास नकार दिला. त्यावेळी विजय मोबाईल देत नाहीत हे पाहून शाहिदने त्यांच्या डोळ्यात स्प्रे मारत त्यांना मारहाण केली. आणि त्यांच्या खिशातील मोबाईल जबरीने काढून तेथून पळ काढला. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे उल्हासनगर परिसरात सापळा रचून शाहिदला अटक केली.