मुंबई

घरफोडी चोरी करणारे सराईत गुन्हेगार अटकेत…

डोंबिवली – घरफोडी चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना मानपाडा पोलिसांनी अटक करून १८ गुन्हे उघडकीस आणून एकूण २० लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. युसुफ रशिद शेख आणि नौशाद मुस्ताक आलम उर्फ सागर अशी या दोघांची नावे आहेत.

मानपाडा पोलीस ठाणे हददीत घरफोडी चोरीचे गुन्हे घडत असल्याने त्यानुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून २०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने २,२०,५००/- रूपये रोख रक्कम, ०२ मोटार सायकल, २ लॅपटॉप, ८ मोबाईल, ५ मनगटी घडयाळ, १ कॅमेरा, १ स्पिकर, १ एटीएम कार्ड, १ नंबर प्लेट, १ हेल्मेट, घडफोडी करण्याकरीता वापरलेले दोन लोखंडी कटावणी, स्कु ड्रायव्हर, पकड, व चाकू असा एकूण २०,१५,००० /- रू. चा मुददेमाल हस्तगत केला. तसेच ठाणे शहर, नवीमुंबई आणि मुंबई परिसरातील १८ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले.

दरम्यान, हे दोघेही सराईत गुन्हेगार असून यापूर्वी युसूफ शेख यास एकूण २३ गुन्ह्यात तर नौशाद आलम यास एकूण ११ गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

सदरची यशस्वी कामगिरी दत्तात्रय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग कल्याण, सचिन गुंजाळ, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३ कल्याण व सुनिल कुराडे सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश मदने, पोनि (प्रशा) अति कार्यभार वपोनि सपोनि सुनिल तारमळे, सपोनि अविनाश वणवे, सपोनि प्रशांत आंधळे, सपोउपनिरी भानुदास काटकर, पोहवा सुनिल पवार, पोहवा  संजु मासाळ, पोहवा विकास माळी, पोहवा शिरीष पाटील, पोहवा राजेंद्र खिलारे, पोहवा दिपक गडगे, पोहवा सोमनाथ ठिकेकर, पोना  गणेश भोईर, पोना, शांताराम कसबे, पोना  प्रविण किनरे पोना देवा पवार, पोना येलप्पा पाटील, पोना अनिल घुगे, पोशि विजय आव्हाड, पोशि अशोक आहेर, पोशि महेंद्र मंजा पोशि संदीप चौधर यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page