मुंबई
सुषमा अंधारे, राखी सावंत दोघी बहिणी – मोहित कंबोज…

मुंबई – भाजप नेते मोहित कंबोज यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची तुलना अभिनेत्री राखी सावंतशी केली आहे.
सुषमा अंधारे यांनी ठाण्यातील मोर्च्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली होती. त्या टीकेचा भाजप नेते मोहित कंबोज यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. त्यांनी एक ट्विट करत सुषमा अंधारे आणि राखी सावंत बहिणी असल्याचा टोला लगावला आहे.
सुषमा अंधारे आणि राखी सावंत या दोन्ही बहिणी आहेत. एक बहीण महाराष्ट्राच्या राजकारणात तर दुसरी बहीण महाराष्ट्राच्या सिनेमामध्ये. दोन्ही बहिणी एकमेकींशी स्पर्धा करत आहेत की रोज सगळ्याच जास्त सनसनाटी कोण निर्माण करेल. असे मोहित कंबोज यांनी ट्वीटमध्ये म्हंटले आहे.