शनिदेवाला आता ब्रँडेड तेलाने करावा लागणार अभिषेक…

ahilya nagar – शनिशिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्त मंडळाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता शनि देवाला फक्त ब्रँडेड तेलानेच अभिषेक करण्यात येणार आहे. देवाला यापुढे शुद्ध तेलाचा तेलाभिषेक करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, १ मार्च पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
शनिदेवाला भाविकांकडून तेलाचा अभिषेक किंवा तेल अर्पण करण्यात येत असते. अनेक भाविक वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यतेल, सुटे तेल किंवा मिश्रित तेल आणून अभिषेक करत असतात. साधे तेल केमिकल युक्त असल्यामुळे शनि देवाच्या शिळेवर परिणाम होत आहे. शनिदेवाच्या शिळेची झीज होत आहे.
याच पार्श्वभूमीवर विश्वस्त मंडळाकडून हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन नियमांनुसार १ मार्च पासून भाविकांना फक्त ब्रँडेड आणि शुद्ध रिफायनरी तेलानेच शनिदेवावर अभिषेक करावा लागणार आहे.